Duration 5500

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना चांगल्या आणि दर्जेदार सुविधा देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

365 watched
0
3
Published 28 Aug 2021

महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क अर्थात मॅग्नेट या प्रकल्पाद्वारे राज्यात एक हजार कोटी रुपयांची कृषि क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करून शेतकऱ्यांना चांगल्या आणि दर्जेदार सुविधा देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. ‘मॅग्नेट’ प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या राज्यातल्या पहिल्या फळे आणि भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्राचं भूमिपूजन बारामती इथं अजित पवार यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. ‘मॅग्नेट’ प्रकल्पांतर्गत कृषि क्षेत्रात एक हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात कृषिक्षेत्रासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात येणार असून शेतकऱ्यांनी कष्टानं पिकवलेल्या शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मदत होणार आहे. फळे, भाजीपाल्याचे जवळपास ४० टक्के नुकसान हे कृषि मूल्य साखळीच्या विविध टप्प्यामध्ये होतं. काढणी पश्चात साठवण आणि शीतसाखळी सुविधांच्या माध्यमातून शेतमाल शेतापासून ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत होणारं नुकसान कमी करता येऊ शकतं, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 28/08/2021

Category

Show more

Comments - 0